‘चांद्रयान २’च्या प्रक्षेपणानंतर प्रभास म्हणतो…

२२ जुलै रोजी भारताचं ‘चांद्रयान २’ हे चंद्राच्या दिशेने झेपावलं. या यानला चंद्रावर पोहचण्यासाठी चाळीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. या चांद्रयानाचा आणि बाहुबली या चित्रपटाचा जवळचा संबंध आहे. ‘चांद्रयान २’चे वहन करणाऱ्या रॉकेटला ‘बाहुबली’ हे नाव देण्यात आले.

हे रॉकेट अत्यंत भव्य असल्याने हे नाव निवडण्यात आलं आहे. दरम्यान, या रॉकेटला बाहुबली नाव देण्यात आल्यामुळे  प्रभासने सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला आहे.“चांद्रयान २चं प्रक्षेपण होणं ही साऱ्यांसाठीच आनंदाची बाब आहे. ‘चांद्रयान २’ चंद्राच्या दिशेने झेपावलं आहे. खरं तर हा बाहुबली चित्रपटाच्या टीमसाठी आनंदाचा आणि सन्मानाचा दिवस आहे. ‘चांद्रयान २’चं वहन करणाऱ्या रॉकेटला बाहुबलीचं नाव देण्यात आलं आहे. अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर हा दिवस आला आहे. या यानामध्ये ३०० टनापेक्षा अधिक वजन नेण्याची क्षमता आहे”, असं ट्विट प्रभासने केलं आहे.

 

You might also like