प्रभासला भेटली बॉलिवूडची ‘देवसेना’!

गेल्या ३ महिन्यांपासून कोरोनाने राज्याला घातलेला विळखा हा वाढतच आहे. बॉलिवूड कलाकार अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अनेक राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सुरु झालेल्या लॉकडाउनमुळे जवळपास तीन महिने मालिका, सिनेमा यांच शूटिंग बंद होतं. दुसरीकडे अनेक कलाकार हे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांचं मनोरंजन करत आहे.

‘बाहुबली’ या चित्रपटामुळे केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता प्रभास लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा झाली असून बॉलिवूडमधली मस्तानी दीपिका पदुकोण यामध्ये त्याच्यासोबत झळकणार आहे.  त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर याविषयीची माहिती दिली.

‘दीपिकासोबत काम करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत’, असं कॅप्शन प्रभासने दिलं आहे. प्रभासचा 21 वा सिनेमा आहे. त्यामुळे ‘प्रभास 21’ असे या सिनेमाचे नामकरण करण्यात आले आहे. दिग्दर्शक नाग अश्विन हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. तेलुगू सिनेसृष्टीत दीपिकाचा हा डेब्यू चित्रपट असणार आहे. याविषयी तो म्हणाला, “दीपिकाला ही भूमिका साकारताना पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. कोणत्याही मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने याआधी अशी भूमिका साकारली नव्हती. दीपिका आणि प्रभासची जोडी हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य असेल.”

याआधी प्रभास ‘साहो’ चित्रपटात झळकला होता. यामध्ये श्रद्धा कपूरने त्याच्यासोबत भूमिका साकारली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. याशिवाय प्रभासच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वी झाली होती. त्यामध्ये प्रभाससोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

दिग्दर्शक एस. एस. राजमौलींचा ‘बाहुबली’ केल्यानंतर प्रभास चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. पद्मावत, बाजीराव मस्तानी, छपाक असे सिनेमे करणारी दीपिकाही यशाच्या शिखरावर आहे. आता हे दोन्ही सुपरस्टार एकत्र येणार म्हटल्यावर चाहत्यांच्या उत्कंठता वाढली आहे. इतकी की, दीपिका व प्रभासची नावे सोशल मीडियावर ट्रेंड होत होते. या सिनेमाचे शूटिंग पुढील वर्षी एप्रिलमध्ये सुरू होणार असून हा सिनेमा साधारण 2022 मध्यें प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

You might also like