‘खिचिक’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

“खिचिक” या मराठी चित्रपटाची  सध्या चर्चा आहे. सोशल मीडियाद्वारे या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं असून, लक्ष वेधून घेणारं हे पोस्टर आहे.

या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, सुदेश बेरी, अनिल धकाते , शिल्पा ठाकरे, पॉला मॅकगिलीन, शीतल ढाकणे,  रसिका चव्हाण ,यश खोंड आदी कलाकारांचा अभिनय आपल्याला या सिनेमात पहायला मिळणार आहेत.

विशेष म्हणजे सिनेमात कलाकारांच्या गेटअपमध्ये प्रयोग कऱण्यात आले आहेत. चित्रपटाच्या नावातून हा सिनेमा कोणत्या विषयावर आधारित आहे हेच स्पष्ट होत नसून फक्त सिनेमाच्या टायटलमुळेचित्रपटाची उत्सुकता कमालीची वाढली आहे. येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

You might also like