सुशांत प्रकरणात ‘या’ अभिनेत्रीचा हात असण्याची दाट शक्यता- रामदास आठवले

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर अनेक मुद्दावर चर्चा झाल्या. याप्रकरणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. शिवाय रामदास आठवले यांनी सुशांतच्या वडिलांची त्यांच्या हरियाणातील घरी जाऊन भेट घेतलीये. शुक्रवारी रामदास आठवले सुशांतच्या वडिलांची भेट घेण्यासाठी हरियाणातील फरीदाबाद इथल्या घरी पोहोचले होते. यावेळी रामदास आठवले यांनी सुशांतला न्याय नक्कीच मिळेल असं आश्वासन दिलंय.
रामदास आठवले यांच्या सांगण्यानुसार, सुशांतची हत्या झाली असा मला संशय आहे. यामध्ये रियाचा हात असू शकतो. मी यापूर्वी देखील हा संशय व्यक्त केला होता. सध्या या प्रकरणाची सीबीआय़द्वारे चौकशी सुरु आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. तसंच संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे.
सुशांतसारखा नाव कमावलेला मुलगा अचानक कशी आत्महत्या करू शकतो याबाबत आठवले यांनी प्रश्न उपस्थित केलं. “सुशांत भविष्य उज्ज्वल होतं. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा होणार नाही याची काळजी घेतली जाईल,” असंही आठवले यांनी सुशांतच्या वडिलांना सांगितलं.