छोट्या पडद्यावरील ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीला कोरोनाची लागण

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ६,४९७ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २ लाख ६० हजार झाली आहे. करोनाने आणखी १९३ जणांचा बळी घेतल्याने राज्यात मृतांची एकूण संख्या १०,४८२ वर पोहोचली आहे.गेल्या २४ तासांत १८ हजार ८५० रुग्ण करोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३ टक्के आहे.

दरम्यान, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्रेनू पारिख हिला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शाअर करून ही माहिती दिली. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसंच तिच्यात हळूहळू तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

“काही दिवसांपूर्वी माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी रुग्णालयता अॅडमिट असून हळूहळू माझ्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी देवाकडे प्रार्थना करा. मी मनापासून करोना वॉरियर्सचे आभार मानते. या कठीण प्रसंगात ते प्रत्येक रुग्णाची व्यवस्थित काळजी घेत आहेत”जर योग्य काळजी घेऊन सुद्धा जर तुम्हाला करोनाची लागण झाली तर असं समजा की एक अदृश्य राक्षस तुमच्या समोर आहे आणि तुम्हाला त्याच्याशी लढायचं आहे. त्यामुळे कृपया काळजी घ्या”.असं श्रेनूने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

अनुपम खेर यांच्या आईला त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं माहित नाही; ‘हे’ आहे कारण

You might also like