‘सडक 2’ मधून पुन्हा बॉलीवूडमध्ये पर्दापण करणार पूजा भट्ट

पूजा भट्टने अनेक वर्षांपूर्वीच अभिनयाला अलविदा म्हटले होते. मात्र, १८ वर्षानंतर ती पुन्हा ‘सडक-2′ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पर्दापण करत आहे.

आपल्या पर्दापणबाबत पूजा म्हणते, मी अभिनय करण्यास बाय-बाय म्हटले होते. पण जेव्हा तुम्ही कलाकार होता, तेव्हा कलाकारच राहता. मी कधीही योजनाबद्ध जीवन जगले नाही. तसेच मी अभिनेत्री बनू इच्छित नव्हती. मी तर आर्किटेक्‍ट किंवा ऐस्ट्रोनॉट बनू इच्छित होती. पण आता तो सर्व इतिहास आहे.

दरम्यान, ‘सडक-2’मध्ये पूजा भट्ट आणि संजय दत्त हे एका वयोवृद्ध दाम्पत्यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर पूजाची छोटी बहिण आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे डायरेक्‍शन पूजाचे वडिल महेश भट्ट हे करत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

You might also like