‘या’ कारणामुळे पोलीस करणार पत्रकार राजीव मसंदची चौकशी

सुशांतच्या आत्महत्ये नंतर बॉलीवूडमधील घराणेशाहीवर चर्चा रंगली आहे. यातच नेहमीच वादग्रस्त वक्‍तव्य करून चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने सुशांतसिंहच्या मृत्यूनंतर प्रतिक्रिया देताना या विषयाला तोंड फोडले.

दरम्यान, कंगनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजीव मसंद यांची चौकशी झाली पाहिजे, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांना समन्स बजावण्यात आले आहेत. कंगना या मुलाखतीत म्हणाली होती,’सुशांतला फसवलं गेलंय. लोकांनी स्वत:ला संपवून घ्यावं, हे या लोकांना पाहायचं असतं. मुंबई पोलीस आदित्य चोप्रा, महेश भट्ट, करण जोहर, राजीव मसंद यांची चौकशी का करत नाहीये? कारण ही चार लोकं खूप शक्तीशाली आहेत.” सुशांतच्या आत्महत्येनंतर राजीव मसंदलाही सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. ‘मी टू’अंतर्गत सुशांतवर झालेले खोटे आरोप आणि त्याच्याविषयी सांगितल्या गेलेल्या इतर बातम्यांमध्ये मसंद यांच्यावर निशाणा साधला जात आहे.

कंगना पुढे म्हणाली, या प्रकरणी राजीव मसंद यांची चौकशी झाली पाहिजे, असं वक्तव्य केलं आहे.’ तत्पूर्वी, सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत ३५ हून अधिक लोकांची चौकशी मुंबई पोलिसांनी केली आहे.

You might also like