‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट जगभरात ११ एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता परंतु लोकसभा निवडणूक २०१९ च्या दृष्टीने प्रदर्शनाच्या काही दिवस आधी निवडणूक आयोगाकडून चित्रपट प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. परंतु आता २४ मे रोजी ‘पीएम नरेंद्र मोदी’ प्रदर्शित होण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

चित्रपटात विवेक ओबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर अमित शाह यांची भूमिका मनोज जोशी साकरणार आहेत. चित्रपटात दर्शन कुमार, बोमन ईरानी, प्रशांत नारायणन, जरीना वहाब, बरखा बिष्ट सेनगुप्ता, अंजन श्रीवास्तव, यतीन कार्येकर, राजेंद्र गुप्ता, अक्षत आर सलूजा प्रमुख भूमिकेत असणार आहेत. सुरेश ओबेरॉय, आनंद पंडित आणि आचार्य मनीष यांनी चित्रपटाची निर्मीती केली आहे.

You might also like