एकाच दिवशी झळकणार ४० देशांमध्ये ‘पी.एम नरेंद्र मोदी’ चित्रपट

पी.एम. नरेंद्र मोदी हा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २४ मे रोजी भारतासह तब्बल ४० देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मोदी यांची व्यक्तीरेखा साकारणारा विवेक ऑबेरॉयनं नागपूरात ही माहिती दिली.

पी.एम.नरेंद्र मोदी या चित्रपटाचं नवीन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये हे पोस्टर लॉन्च झालं. यावेळी विवेकने या चित्रपटाविषयी . सुरेश ओबेरॉय, आनंद पंडित आणि संदीप सिंग निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे. सुरेश ओबेरॉय, आनंद पंडित आणि संदीप सिंग निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे.