‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटात रतन टाटा यांचे पात्र साकारणार ‘हा’ अभिनेता

‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विवेक ओबेरॉय मोदींच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसं पूर्वी नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री आणि अमित शहा यांची व्यक्तिरेखा कोण साकारणार, हे लोकांना कळले.

मात्र आता आणखी एका पात्राविषयीची माहिती समोर आली आहे. या चित्रपटात प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे पात्र असणार आहे. हे पात्र बोमन इराणी साकारणार आहे. खुद्द बोमन इराणी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

‘मी रतन टाटांसारखा दिसतो, असे अनेक लोक मला म्हणतात. पडद्यावर रतन टाटांची भूमिका साकारायला मिळाली तर, असा विचार त्यामुळेच अनेकदा माझ्यात मनात येत असे आणि याचदरम्यान मला या भूमिकेसाठी बोलवण्यात आले. चित्रपटात माझी भूमिका छोटीशी आहे. पण तितकीच महत्त्वाची आहे. मी लगेच या भूमिकेसाठी होकार कळवला,’असे बोमन यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

 

 

 

You might also like