‘सुपर ३०’च्या गाण्यावर हृतिकच्या आईचा डान्स व्हायरल

हृतिक रोशनची आई पिंकी यांनी त्यांचा डान्स करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. वयाच्या ६४व्या वर्षी देखील त्यांना नृत्य करताना पाहून चाहते त्यांच्यावर फिदा झाले आहेत.पिंकी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये सुरुवातीला त्या जिममध्ये नृत्य करताना दिसत आहेत. त्यानंतर त्या मुलगा हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’ चित्रपटातील ‘जोगराफिया’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत पिंकी यांनी ‘सुपर ३०च्या यशाचा वर्कआऊट’ असे कॅप्शन दिले आहे. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.