पाठक बाई करणार पुन्हा लग्न…..

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेच्या गावात निवडणूक आहे. त्या निवडणुकीला पाठकबाई आणि त्यांची खलनायिका वहिनी उभ्या राहणार आहे.पाठकबाईंना त्यांचा दीर पाठिंबा देतोय, तर वहिनीच्या बाजूनं उभं राहण्याचं राणानं ठरवलंय.वहिनीनं राणाकडून तसा शब्दच घेतलाय. अर्थात, घरात राजकारण आणायचं नाही, असं पाठकबाई आणि राणानं ठरवल आहे.
आता या निवडणुकीसाठी काही कागदपत्र लागणार आहेत आणि त्यात आहे लग्नाचं सर्टिफिकेट.राणादा आणि पाठकबाईंच्या लग्नाचा पुरावा. पण हा पुरावा वहिनीने गायब केला.मग अशा वेळी अंजली पाठक राणाशी पुन्हा लग्न करायचा निर्णय घेतात. त्यासाठी पाठकबाई राणाचं मन वळवणार आहात.रविवारच्या महाएपिसोडमध्ये हे सर्व पाहता येईल.
महत्वाच्या बातम्या –
- ११ वर्षांची असल्यापासून मी रणबीरच्या प्रेमात
- कपिलला आली सुनील ग्रोवरची आठवण
- ‘या’ कारणामुळे रिंकूच्या ‘कागर’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले
- ‘ठाकरे’ चित्रपटामुळे ‘या’ सिनेमाने बदलली प्रदर्शनाची तारीख