‘परफ्युम’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित….

परफ्युममुळे कॉलेजवयीन नायक-नायिका एकत्र येतात आणि त्यांच्या प्रेमकहाणीला कसं थरारक वळण मिळतं याचं चित्रण ‘परफ्युम’ या चित्रपटाद्वारे पहायला मिळणार आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसं पूर्वी प्रदर्शित करण्यात आला आहे. अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनी ‘परफ्युम’ हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. तर डॉ. हेमंत दीक्षित आणि ओंकार दीक्षित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर करण तांदळे यांनी चित्रपटानं दिग्दर्शक आणि छायांकन केलं आहे.

ओंकार आणि मोनालिसा यांच्यासह चित्रपटात सयाजी शिंदे, चिन्मय मांडलेकर, कमलेश सावंत, अभिजित चव्हाण, अनिल नगरकर, भाग्यश्री न्हालवे, हिना पांचाळ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. आजवर प्रेक्षकांनी असंख्य प्रेमपट पाहिले असले, तरी परफ्युम हा चित्रपट नक्कीच वेगळा आहे. १ मार्चला महाराष्ट्रात सर्वत्र परफ्युम हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like