महाराजांविषयी प्रश्न उपस्थित करणाऱ्या पायलचा माफीनामा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी पायल रोहतगीने एक पोस्ट केली होती ज्यामध्ये तिने महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत असं म्हटलं होतं. महाराजांचा जन्म हा शूद्र जातीच्या शेतकरी कुटुंबात झाला होता, असंही ती म्हणाली होती. ज्यानंतर या मुद्द्यावरुन तिने एका नव्या वादाला तोंड फोडलं.

आपल्या वक्तव्याला आणि पोस्टला होणारा हा विरोध पाहता अखेर तिने एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांचीच माफी मागितली आहे. सोशल मीडियावरुण आपल्याला होणारा विरोध पाहता, नेटकऱ्यांलेखी आपलं काहीच अस्तित्वं नसून, कोणत्याही प्रकारचे प्रश्न उपस्थित करण्यास आपण पात्र नसल्याची खंत तिने व्यक्त केली. सोबतच भारत देशात कोणा एका व्यक्तीला साधं अभिव्यक्ती स्वातंत्र्यही नाही, ही बाब अधोरेखित करत तिने वारंवार झाल्या प्रकाराविषयी सर्वांची माफी मागितली आहे.