सलमानची बिइंग ह्युमन कंपनी केवळ एक पब्लिसिटी स्टंट – पायल रोहतगी

पायल रोहतगी हिने आता  सलमान खानवर निशाणा साधला आहे. सलमानची बिइंग ह्युमन कंपनी केवळ एक पब्लिसिटी स्टंट आहे. हिट अँड रन केसमधून सुटलेल्या सलमानची प्रतिमा सुधारण्यासाठी ही संस्था सुरु करण्यात आली. पायलने अशी टिका इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत केली आहे.

“सुरुवातीला माझ्या मनात सलमानबाबत प्रचंड आदर होता. पण गेल्या काही काळात त्याची गुंडगीरी पाहून हा आदर आता संपला आहे. सलमानची बिइंग ह्युमन कंपनी केवळ एक पब्लिसिटी स्टंट आहे. हिट अँड रन केसमधून सुटलेल्या सलमानची प्रतिमा सुधारण्यासाठी ही संस्था सुरु करण्यात आली. या संस्थेचा वापर आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी केला जातो असं म्हटलं जात आहे. बॉलिवूड त्याच्या मालकीचं नाही त्यामुळे त्याने आपली गुंडगीरी थांबवावी. अन्यथा त्याच्या दुष्कर्मांची फळं त्याला याच जन्मात भोगावी लागतील.” अशा  टीका पायलने सलमानवर टीका केली आहे.

 

You might also like