टेढे मुहं वाले पवारसेना को जनता क्वारंटाईन करेगी, कंगणाच्या आईचं वादग्रस्त वक्तव्य

कंगणा आणि शिवसेतील वाकयूद्धात आता कंगणाची आई आशा रणौत यांनी उडी घेतली आहे. काल मुंबईत कंगणाचं कार्यालय बिएमसीने पाडल्यानंतर त्यांनी कंगना रनौत को 14 दिन क्वांरएन्टाइन किया जाएगा : BMC कर लो बेटा …. लेकिन इतना याद रखना , अगले चुनाव के बाद उद्धव की शवसेना , सोनिया सेना , और टेढे मुहं वाले पवार की सेना .. इन सभी को महाराष्ट्र की जनता स्थायी रूप से क्वारेंटाइन करने वाली है …. RT IF YOU AGREE अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी ट्विटर दिली.या संदर्भात त्यांनी ट्विटरवर ट्विट करून महाराष्ट्र सरकारवर टिका केली आहे. आता त्यांच्या या ट्विट वरुन नवीन वादंग सुरू होऊ शकत.

कंगणा रणौतच्या कार्यालयात हतौडा चालवला गेला असून हि कारवाई मुंबई महानगरपालिका (BMC) द्वारे करण्यात आली आहे. कंगणाचं कार्यालय तोडल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत अभिनेत्री कंगणा रणौतची बाजू घेतल्यानंतर शिवसेनेची कोंडी झाल्याचं पाहायला मिळाले होते. आता कंगणाविरोधात कुणी काहीच बोलू नये असा आदेश मातोश्रीवरुन आल्याची माहिती आहे. या प्रकरणी आता शिवसेना आणि मुंबई महापालिकेने माघारी घेतल्याचं चित्र निर्माण झाले आहे.अशातच आता कंगणाच्या आईने वैयक्तिकरित्या टिका केल्याने नवीन वादंग सुरू झाले आहे.

अभिनेत्री कंगना राणावतवर विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव आणला गेला. यासंदर्भात काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी कंगनाविरोधात हक्कभंग मांडला. कंगना ड्रग्स घेत असल्याचे अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन याने एका मुलाखतीत सांगितले होते . त्यामुळे कंगना ड्रग्ज घेत असल्याचा आरोप होत आहे. याबाबत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि सुनील प्रभू यांनी तक्रार दाखल होती. याची चौकशी मुंबई पोलिसांमार्फत केली जाणार आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

You might also like