परिणीती चोप्राला मिळाला मोठा ब्रेक; साऊथ इंडस्ट्रीत करणार काम

दिग्दर्शक एस. एस. राजमौली साऊथ इंडस्ट्रीतील एक बडे नाव आहे. ‘बाहुबली’ व ‘बाहुबली 2’नंतर यावर्षांत राजमौलींचा ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तेलगू चित्रपटाचे दोन मोठे सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यात लीड रोलमध्ये आहेत. पण या चित्रपटाची हिरोईन कोण असणार, हे मात्र गुलदस्त्यात होते. ताजी चर्चा खरी मानाल तर या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राची वर्णी लागली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ‘आरआरआर’साठी परिणीतीसोबत मेकर्सची चर्चा सुरु आहे. शूटींग लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मेकर्सची इच्छा आहे. या चित्रपटात परिणीतीची नेमकी भूमिका काय असणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like