लस आणि लॉकडाऊनवर बाबू भय्यांची एकदम भन्नाट चारोळी

करोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे.मागील २४ तासांमध्ये महाराष्ट्रात ७ हजार १८८ करोना रुग्ण बरे होऊन गेले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ८२ हजार २१७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या म्हणजेच रिकव्हरी रेट ५५.७२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान राज्यात ८ हजार ३६९ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात २४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातला मृत्यू दर ३.७५ टक्के इतका झाला आहे. 

जगभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. करोनामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. अशा या प्रतिकूल परिस्थितीवर  परेश रावल यांनी एका चारोळीच्या माध्यमातून भाष्य केले आहे. त्यांचा हा काव्यात्मक अंदाज सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

संत कबिर यांच्या अंदाजात लिहिलेली चारोळी परेश रावल यांनी ट्विट केली आहे. रहिमन वेकसीन ढूँढीयो बिन वेकसीन सब सून । वेकसीन बिना ही बीत गये अप्रैल मई और जून । लसी शिवाय तीन महिने गेले. मात्र अद्याप करोनावर मात करणारी लस सापडलेली नाही. लवकरात लवकर लस शोधून काढा. अन्यथा आपलं काही खरं नाही. असा या चारोळीचा अर्थ आहे. परेश रावल यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

You might also like