पंकज त्रिपाठी यांच्या ‘कागज’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज, त्रिपाठींचे पात्र ठरणार धमाकेदार…

सर्वांच्या प्रतीक्षेत असलेल्या ‘कागज’ चित्रपटाचा पहिला लूक समोर आला आहे. अभिनेता पंकज त्रिपाठी स्टारर फिल्म ‘कागज’ पुढील वर्षी 7 जानेवारी रोजी डिजिटल प्लॅटफॉर्म जी 5 (झी 5) वर रिलीज होणार आहे. उत्तर प्रदेशमधील निवडक चित्रपटगृहातही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केले आहे.