‘लागिरं झालं जी’ मधील ‘हा’ अभिनेता करतोय ‘पळशीची पीटी’चं दिग्दर्शन

‘लागिरं झालं जी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे धोंडिबा बाळू कारंडे. या मालिकेमध्ये शितलच्या काकाची अप्पा ही व्यक्तीरेखा धोंडिबा यांनी साकारली होती.

या मालिकेनंतर धोंडिबा यांनी त्यांचा मोर्चा चित्रपटाकडे वळविला असून ते ‘पळशीची पीटी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. हटके कथानक असणाऱ्या धोंडिबा कारंडे लिखित ‘पळशीची पीटी’ या चित्रपटाची कथा ‘भागी’ नावाच्या मुलीभोवती गुंफलेली आहे. येत्या २३ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

You might also like