एक नजर ‘सिम्बा-द लायन किंग’ चित्रपटाच्या कमाईवर

‘सिम्बा-द लायन किंग’ हा चित्रपट चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने जवळपास ११ कोटींपर्यंत मजल मारली आहे. येत्या काळात हा चित्रपट किती रूपयांचा आकडा गाठेल या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहे. १९ जुलैला प्रदर्शित झालेला हा चित्रपट भारतात एकूण २ हजार १४० स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘सिम्बा-द लायन किंग’ चित्रपट हिंदी, तेलुगू, इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये डब करण्यात आला आहे.

या चित्रपटाला आवाज  शाहरूख खान आणि मुलगा आर्यन खान यांनी दिला आहे. मुफासा या व्यक्तीरेखेला शाहरूखने आवाज दिला आहे, तर सिम्बा या व्यक्तीरेखेला आर्यनने आवाज दिला आहे.