झी मराठीवर आज आहे मनोरंजनाचा खास रविवार!

झी मराठी वाहिनीवर ६ जानेवारी  प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांचे एक तासांचे विशेष भाग प्रसारित होणार आहेत. ‘लागीरं झालं जी’, ‘तुझ्यात जीव रंगला’ आणि’ माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकांचे विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

‘माझ्या नवऱ्याची बायको’मध्ये सुलक्षणा बाईंची एण्ट्री झाली असून राधिकाची ३०० करोडची कंपनी, मालमत्ता बळकावण्याचा तिचा उद्देश आहे. तर दुसरीकडे गुरुनाथला शनायासोबत लग्न करायचं आहे.त्यांचं लग्न पार पडणार का? राधिका हा लग्नाचा डाव कसा उलटणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना आज पाहायला मिळणार आहेत.

तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत.अंजली राणाला तिच्यासोबत पुन्हा एकदा लग्न करण्याची मागणी करते. आता राणा नक्की काय करणार हे या विशेष भागात पाहायला मिळेल.

‘लागीरं झालं जी’ मालिकेत शीतल मामींना हाताशी घेऊन हर्षवर्धन आणि जयश्री यांना त्यांच्या घरी रवाना करायच्या प्रयत्नात आहे आणि काही प्रमाणात ती यशस्वी देखील होते. पण हर्षवर्धनला शीतलच्या पुढील चालीची चाहूल लागताच तो काय करेल? या खेळात कोण कोणावर मात करणार हे प्रेक्षकांना रविवारी संध्याकाळी ७ वाजता पाहता येईल.

महत्वाच्या बातम्या –

You might also like