आदित्य पांचोली पुन्हा एकदा वादात…..

आदित्य पांचोली पुन्हा एकदा वादात अडकला आहे. यावेळी एका कार मॅकॅनिकने आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. “आदित्यने माझ्याकडून कार दुरुस्त केली होती. पण दुरुस्तीचे पैसे मागितले असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिली,” असा आरोप कार मेकॅन‍िकला केला आहे.

आदित्य पांचोलीने कार मॅकॅनिक मौसिम राजापकर याच्याकडून कार दुरूस्ती करून घेतले होते. कार दुरूस्तीकरण्याचं  बिल २ लाख ८२ हजार १५८ रूपये इतका खर्च सांगितला. मौसिमने पैशांची विचारणा करण्यासाठी आदित्यला फोन व मेसेज करून त्याचा पाठपुरवठा केला. पण आदित्यने कोणतेही उत्तर न देता त्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे मौसिमने सांगितले. मौसिमने याबाबत वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

You might also like