श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय यांच्या ‘हम्मा हम्मा’ गाण्याचा धुमाकूळ

मुंबई – ९०च्या दशकात ए आर रेहमान यांनी संगीतबद्ध केलेलं ‘हम्मा हम्मा’ हे गाणं खुपच हिट झालं होतं. या गाण्यामुळे संगीतकार ए आर रेहमान यांनाही एक नवी ओळख मिळाली होती. हे गाणं आता पुन्हा एकदा नव्या स्वरुपात पहायला मिळत आहे. श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्या आगामी ‘ओके जानू’ या सिनेमाचं ‘हम्मा हम्मा’ हे पहिलं गाणं रिलीज झालं आहे

‘ओके जानू’ या सिनेमातील ‘हम्मा हम्मा’ या गाण्यालाही ए आर रेहमान यांची संगीत आहे. मात्र, हे गाणं थोड्या वेगळ्या स्वरुपात सादर करण्यात आलं आहे. या गाण्यात श्रद्धा कपूरचा डान्स आणि बोल्डनेस पहायला मिळतो. आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हम्मा हम्मावर डान्स करताना पहायला मिळत आहेत. हे गाणं ए आर रेहमान, बादशाह आणि तनिष्क यांनी गायले आहे.

You might also like