आता ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ येणार ‘ह्या’ भाषेत; बनणार रिमेक

विकी कौशलचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. या चित्रपटातील विकी कौशलच्या भूमिकेला व चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर नऊ दिवसांच्या आत ९१.८४ कोटींची कमाई केली.

आता या चित्रपटाचा साऊथमध्ये रिमेक बनणार आहे. उरी चित्रपटाचे निर्माते रोनी स्क्रूवाला व आरएसवीपी प्रोडक्शन टीमला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतल्या कित्येक निर्मात्यांचे फोन आले आणि हा सिनेमा आपल्या भाषेत बनवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे हा चित्रपट तमीळ, तेलगू व मल्याळम भाषेत बनणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like