आता ‘हि’ स्टार किड करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, झळकणार आर. माधवनसोबत

सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किडची चलती आहे.  आता आणखीन एक स्टार किड बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. ही स्टार किड म्हणजे प्रसिद्ध भजन गायक गुलशन कुमार यांची मुलगी खुशाली कुमार आहे.

ती आर. माधवनसोबत झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव दही चिनी असं आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला पुढील महिन्यात सुरूवात होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अश्विन नील मणी करणार आहेत. ही माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर दिली. त्यांनी या चित्रपटाचं पोस्टरही शेअर केलं आहे.

You might also like