‘एबीसीडी-३’ साठी श्रद्धा नंतर नोरा फतेहीची वर्णी?

रेमो डिसुझा दिग्दर्शित ‘एबीसीडी-३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्रद्धा कपूर आणि वरूण धवन हे पुन्हा एकदा या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. श्रद्धानंतर आता अभिनेत्री नोरा फतेही हीची देखील वर्णी या चित्रपटात लागली आहे. यात ती देखील मुख्य भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे.

‘सत्यमेव जयते’ चित्रपटातून नोरा फतेहीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती आता ‘एबीसीडी-३’ मध्ये दिसणार असल्याने पुन्हा एकदा तिचा डान्स प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

‘एबीसीडी’ चित्रपटाची सिरीज ही डान्सवर आधारित होती. आता तिसरा भाग हा देखील डान्सवरच आधारित आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला २२ जानेवारीपासून पंजाबमध्ये सुरुवात होणार आहे. तर या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –

You might also like