आता शिवसेनेची पडझड…काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा घणाघात

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयाला अनधिकृत बांधकामाची नोटीस काही दिवसांपूर्वी देण्यात आली होती. कंगना रणौतने शिवसेनेसह संजय राऊत यांना देखील आव्हान देत आज मुंबईमध्ये येणार असून हिम्मत असेल तर रोखून दाखवा असे वक्तव्य केले होते.
आज कंगना रणौत मुंबईमध्ये दाखल झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सुडबुद्धीच्या राजकारणाने कंगनाचे कार्यालयावर कारवाई केली जात असल्याचे आरोप आता शिवसेनेसह मुंबई महापालिकेवर होत आहे. तर, महाविकास आघाडीचा भाग असलेल्या काँग्रेसच्या नेत्यानेच सरकारमधील पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी, ” कंगनाचं कार्यालय अनधिकृत होत कि पडझड करण्याचा प्रयत्न? कारण उच्च न्यायालयाने या कारवाईला चुकीचे ठरवत तत्कालीन स्थगिती दिली आहे. पूर्ण कारवाई ही सुडबुद्धीने केली गेली आहे. मात्र, बदल्याचे राजकारण फार काळ टिकत नाही. आता एका कार्यालयाच्या चक्करमध्ये शिवसेनेची पडझड सुरु होऊ नये! ” असे ट्विट केलं असून सुचक इशारा त्यांनी दिला आहे.
कंगना का ऑफिस अवैध था या उसे डिमॉलिश करने का तरीका ?
क्योंकि हाई कोर्ट ने कार्रवाई को गलत माना और तत्काल रोक लगा दी।
पूरा एक्शन प्रतिशोध से ओत-प्रोत था।
लेकिन बदले की राजनीति की उम्र बहुत छोटी होती है।
कहीं एक ऑफिस के चक्कर में शिवसेना का डिमॉलिशन न शुरु हो जाए !#KanganaRanaut— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) September 9, 2020