आता नारायण मूर्ती यांच्या आयुष्यावर बायोपिक

प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगत आहे. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या जीवनावर बायोपिक येणार आहे.दिग्दर्शक संजय त्रिपाठी हे सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत.

नारायण मूर्ती यांचा बायोपिक तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी असेल यात शंका नाही. नारायण मूर्ती यांनी बायोपिक बनवण्यास सपशेल नकार दिला होता. पण अनेक भेटींनंतर मूर्ती यांनी बायोपिक काढण्यास मंजूरी दिली असल्याची माहिती समोर आली आहे.दिग्दर्शक संजय त्रिपाठी यांनी मूर्ती यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढण्याची इच्छा बोलून दाखवली होती. आठ महिन्यानंतर सिनेमाला मंजुरी मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या –