आता परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी धावून आला सोनू सूद

राज्यात लॉकडाऊन काळात अडकलेल्या हजारो परराज्यातील मजुरांसाठी सोनू सूद हा देवदूतच बनला होता. त्याने स्वखर्चातून हजारो परप्रांतिय लोकांना आपापल्या गावी जाण्यासाठी सोनू सूदने बसची सोय केली होती. यानंतर त्याचे देशभरात कौतुक झाले, ‘रिअल हिरो’ म्हणून त्याला आता ओळखले जाऊ लागले आहे. तर सोनू सूदने परत एकदा माणुसकी दाखवून देत परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी खास सोय केली आहे.

विदेशात अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सज्ज झाला आहे. किर्गिस्तान येथे अडकलेल्या जवळपास ३ हजार भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सोनू सूद पुढे सरसावला आहे. या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी पहिले विमान रवाना होणार आहे. सोनूने स्वत: सोशल मीडियावर याची माहिती दिली. किर्गिस्तान येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी आणण्याची वेळ आलीय, असे सांगितले होते.

२२ जुलैला पहिले चार्टर फ्लाईट यासाठी रवाना होणार होते. मात्र खराब हवामानामुळे २३ जुलै हे विमान किर्गिस्तान ते वाराणसी असे उड्डाण घेतली, अशी माहिती देखील त्याने दिली होती. याच आठवड्यात काही आणखी देशांतही चार्टर फ्लाईट पाठवले जाईल, असे ट्विट सोनूने केले होते.

करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे किर्गिस्तान येथे शिक्षणासाठी गेलेले जवळपास ३ हजार विद्यार्थी तेथे अडकले आहेत. या विद्यार्थ्यांचे कुटुंबीय हे चिंतीत होते. दरम्यान, भारत सरकार देखील विद्यार्थ्यांना देशात परत आणत असले तरी ते एवढ्या मोठ्या प्रमाणात होत नव्हते. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी थेट सोनू सूदलाच मदत मागीतल्यानंतर त्याने त्यासाठी देखील तत्परतेने सोय निर्माण केली.

‘इतकेच नाही, लोकांना घरी पोहोचवण्यासोबतच त्यांच्या डोक्यावर छत दिल्यानंतर आता तो गरजू लोकांच्या रोजगाराची व्यवस्था करत आहे. सोनूने सांगितले की, ‘आपल्या गावी परतल्यावर लोक आता रोजगार शोधत आहेत. सध्या काम मिळणं फार कठिण आहे. भलेही केंद्र सरकारची योजना आहे. पण लोकांना सध्या लॉंग टर्म सॉल्यूशनची गरज आहे. या मजूरांना शहरांमध्ये, गावांमध्ये कामाशी जोडणं गरजेचं आहे. तसेच त्यांच्या गावातही त्यांच्यासाठी काम उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन,’ असे सांगत ऍपद्वारे माहिती भरण्यास सांगितले आहे.

 

You might also like