करिना कपूर नाही तर फातिमा सना शेख दिसणार शाहरुख खानच्या या चित्रपटात….!!

शाहरूख खानने आता आपल्या नव्या चित्रपटाची तयारी सुरु केली आहे.या चित्रपटाचे नाव ‘सॅल्यूट’ आहे. या चित्रपटाचे शूटींग यावर्षी मे महिन्यात सुरु होणार होते. पण काही कारणास्तव फेबु्रवारीपासूनचं याचे शूटींग सुरू करण्याचा निर्णय किंगखानने घेतला आहे.
या चित्रपटात करिना कपूर शाहरुखची हिरोईन असणार, असे मानले गेले होते. पण आता एक ताजी बातमी आहे. चित्रपटाचे निर्माता करिनाऐवजी फातिमा सना शेखला कास्ट करू इच्छितात, असे कळतेय.
आधी ‘सॅल्यूट’ आमिर खानला ऑफर झाला होता. पण आमिरने यात काम करण्यास नकार दिल्यावर यासाठी शाहरूखला साईन करण्यात आले. अलीकडे शाहरूखने यासाठी आमिरचे आभारही मानले होते.कदाचित फातिमालाही ‘सॅल्यूट’ मिळवून देण्यामागेही आमिरचाच हात असावा.
महत्वाच्या बातम्या –