आता सुयश टिळक दिसणार या मालिकेत

सुयश टिळकच्या फॅन्ससाठी एक खूपच चांगली बातमी आहे. सुयश आता लवकरच एका मालिकेत झळकणार असून या मालिकेतील त्याची भूमिका ही आजवरच्या त्याच्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. या मालिकेसाठी त्याने चित्रीकरण करायला सुरुवात केली असून या मालिकेत त्याची लवकरच एंट्री होणार आहे.
स्टार प्रवाहच्या छोटी मालकीण या मालिकेत सुयश टिळक धमाकेदार एण्ट्री करणार आहे. ‘छोटी मालकीण’ या मालिकेत सुयश टिळक सुरेश ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. पण ‘छोटी मालकीण’ मधील भूमिका सुयशच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आणि हटके असणार आहे.
महत्वाच्या बातम्या –