आता खुप झालं आणि यावर कठोर कारवाई करण्याची गरज – विद्या बालन

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध संपूर्ण देशाभरातून करण्यात येत आहे. यासोबतच बॉलिवूडमधूनही अनेक बड्या कलाकारांनी पुलवामाचा निषेध करत पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात यावी असे सांगितले होते.

विद्या बालननेही पाकिस्तानी कलाकारांना विरोध दर्शवत कठोर करावाई करणे गरजेचे असल्याचे म्हटलं आहे. आपल्या नवीन रेडीओ शोच्या लाँचिंग दरम्यान तीनं आपले मत व्यक्त केलं. राजकारण हे कला क्षेत्रापेक्षा वेगळं ठेवलं पाहिजे. लोकांना एकत्र आणण्यासाठी कला हाच उत्तम मार्ग आहे. मग ते संगीत, शायरी, डान्स, थिएटर किंवा सिनेमा. पण मला आता असे वाटत आहे की, आता खुप झालं आणि यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे असं अभिनेत्री विद्या बालनने सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

You might also like