आता ‘गजनी २’ येणार….?

आमिर खान ९० च्या दशकातील सर्वाधिक यशस्वी अभिनेता आहे.  आमिरच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाने प्रेक्षकांची प्रचंड निराशा केली. याच आधारावर आमिरने एक मोठा निर्णय घेतला आहे.‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’नंतर आमिर बॉक्स ऑफिसवर दमदार वापसी करू इच्छितो. साहजिकचं यासाठी त्याला तेवढाच दमदार चित्रपट हवा असणार आहे. तर तो चित्रपट आमिरला मिळाला आहे.

डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, आमिरने ‘गजनी 2’ची तयारी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून आमिर आपल्या शरिरावर प्रचंड मेहनत घेतोय. ही कदाचित ‘गजनी 2’ची तयारी असावी, असे मानले जात आहे.
इतकेच नाही तर  ‘गजनी’च्या मेकर्सनी अलीकडे ‘गजनी 2’ हे टायटल रजिस्टर केले आहे. हिंदी आणि तेलगू भाषेत हे टायटल रजिस्टर करण्यात आले आहे. हा चित्रपट कोण दिग्दर्शित करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like