‘इंडियन 2’मध्ये अक्षय नाही तर ‘हा’ अभिनेता साकारणार खलनायकाची भूमिका ?

कमल हसनच्या इंडियन 2 या सिनेमाचं काम सुरू झालं असलं तरी खलनायक कोण साकारणार हे अजून गुलदस्त्यातच आहे. या चित्रपटासाठी दिग्दर्शक शंकर यांनी अजय देवगण व अक्षय कुमारशी बोलणी केल्याची चर्चा होती. तसेच अक्षय कुमारच खलनायकाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा हाती .

मात्र, एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार चक्क अभिषेक बच्चननं बाजी मारली असून इंडियन 2 चा तो खलनायक असेल. या चित्रपटात कमल हसन मुख्य भूमिकेत आहे व लवकरच चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. या संदर्भात अजून अधिकृत घोषणा करणार आली नसली तरी इंडियन 2 या चित्रपटाच्या माध्यमातून अभिषेक तामिऴ सिनेमात पदार्पण करणार असल्याचे वृत्त आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like