‘बच्चन’ नाही तर ‘हे’ आहे अमिताभ बच्चन यांचे खरे आडनाव

माझ्या वडिलांनी म्हणजेच हरिवंशराय बच्चन यांनी जात लपवण्यासाठीच बच्चन हे आडनाव स्वीकारलं असा खुलासा अमिताभ बच्चन यांनी केला आहे. एका कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
माझ्या वडिलांचे आडनाव म्हणजेच आमचे आडनाव श्रीवास्तव असे होते. जात, धर्म यावर माझ्या वडिलांचा विश्वास नव्हता. समाजातून ही प्रथा बंद झाली पाहिजे म्हणून त्यांनी श्रीवास्तव हे आडनाव सोडले आणि बच्चन हे आडनाव स्वीकारले. मग बच्चन हे सगळ्या कुटुंबीयांचे आडनाव झाले असेही अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे.
बच्चन या आडनावाचा गर्व आहे, माझे आडनाव बच्चन असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. १५ फेब्रुवारीला अमिताभ बच्चन यांना हिंदी सिनेसृष्टीत ५० वर्षे पूर्ण झाली. आता त्यांनी सिनेसृष्टीत ५० वर्षे पूर्ण होतानाच बच्चन आडनाव वडिलांनी का स्वीकारलं त्याचं कारण सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या –