भाऊ कदमच्या ‘नशीबवान’ चित्रपटाला मिळेना थिएटर

भाऊ कदमचा ‘नशिबवान’ चित्रपट गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. मात्र इतर मराठी चित्रपटाप्रमाणे ‘नशिबवान’ च्या वाट्यालाही उपेक्षाच आली आहे. ‘नशिबवान’ चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याची खंत भाऊ कदम यानं फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केली आहे.

परभाषिक चित्रपट हिट झाल्यास मराठी चित्रपटाला महाराष्ट्रातच दुजाभाव दिला जातो, अशी हतबलता भाऊ कदमने व्यक्त केली आहे. मध्यमवर्गीयांसाठी तयार केलेल्या चित्रपटाला सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत चित्रपटगृहात काही मोजकेच शो दिले जातात, जेव्हा आमचा मराठी चाकरमानी माणूस आपापल्या कामाच्या ठिकाणी असतो.

भाऊ कदमची मुख्य भूमिका असलेला ‘नशिबवान’ हा चित्रपट गेल्या शुक्रवारी म्हणजेच 11 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित झाला होता. तसेच ‘ज्या डोंबिवली चा उल्लेख मी ‘हवा येऊ द्या’ च्या प्रत्येक भागात करतो, तिथेसुद्धा ‘नशीबवान’ ला एकही चित्रपटगृह, एकही शो मिळाला नाही.असं लिहित मराठी चित्रपटाची महाराष्ट्रात होणारी परवड भाऊनं मांडली आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like