‘बाटला हाउस’ चित्रपटातील ‘ओ साकी साकी’ गाणे प्रदर्शित

नोरा आता ‘ओ साकी साकी’ गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हे गाणे जॉन अब्राहमचा आगामी चित्रपट ‘बाटला हाउस’ मधील आहे.

दरम्यान नोरा या गाण्यामध्ये आगीशी खेळताना दिसत आहे. हे गाणे नेहा कक्कर आणि तुलसी कुमार यांनी गायले असून तनिष्क बागचीने रिक्रिएट केले आहे. नोरा गाण्यामध्ये बेली डान्स करताना दिसत आहे. तिचे हे गाणे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

या चित्रपटामध्ये  जॉन पोलीस अधिकारी संजय कुमार यादव यांची भूमिका साकारणार आहे. १९ सप्टेंबरच्या रात्री असे नेमकं काय घडलं होतं याची दुसरी बाजू या चित्रपटातून समोर येणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल अधिक कुतूहल आहे. हा चित्रपट येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.