सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआय अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी तपास सीबीआयकडे सोपवला होता. गेल्या काही दिवसांपासून सीबीआयनंदेखील या प्रकरणी सुशांतशी निगडीत असलेल्या अनेक व्यक्तींची चौकशी केली

. दरम्यान, या प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि अन्य व्यक्तींच्या चौकशीतून अनेक माहितीही समोर आली. परंतु त्याच्या मृत्यूचं गुढ उकलण्यात मात्र अद्यापही यश आलेलं नाही. सुशांतची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे अद्याप सापडले नसल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या आत्महत्येच्या अँगलवरही आपण लक्ष देत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

तसंच सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचं हे प्रकरण आहे का याचाही तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत सीबीआयनं क्राईम सीन रि-क्रिएट केला. तसंच मुंबई पोलिसांद्वारे जमवण्यात आलेल्या पुराव्यांचा तपास आणि या प्रकरणाशी निगडीत सर्व संशयितांची चौकशीही करण्यात आली आहे.

संशयितांचे जबाब आणि क्राईम सीन रिक्रिएशनकडे पाहता यात हत्येकडे बोट दाखवणारे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचं टीमचं म्हणणं आहे. अद्यापही या प्रकरणाची तपास सुरू आहे. तसंच आत्महत्येच्या अँगलवरही तपास केला जाणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

 

You might also like