मास्क लावून मॉलमध्ये गेलेल्या सोनूला कुणीही ओळखू शकले नाही

सोनू निगमने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो दुबईच्या एका मॉलमध्ये मास्क घालून फिरताना दिसत आहे. विशेष म्हणजे इथे त्याला कोणीही ओळखू शकले नाही. हे सांगताना सोनूने लिहेल, ‘आजचा बोनस -कुणीही ओळखलं नाही.’
सोनू निगम सध्या दुबईत अडकला आहे. लॉकडाऊनमुळे तो परत येऊ शकला नाही. त्यानंतर तो तिथून त्याेचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
शेअर केलेल्या व्हिडीओत सोनू म्हणतोय, जगाला काय झाले आहे आणि हे चांगले झाले की, कुणीही ओळखले नाही. हे ऐकून त्याचा मुलगा निवान हसायला लागतो. यानंतर सोनू म्हणतो, ‘हे चांगलं आहे, हा मॉल ऑफ इमिरेट्स आहे.’