अभिनेत्री निवेदिता सराफला कोरोनाची बाधा

निवेदिता सराफ यांना कोरोनाची सौम्य लक्षण जाणवल्यामुळे त्यांनी कोव्हिड-19ची टेस्ट करुन घेतली. दुर्दैवाने त्यांची ही टेस्ट पॉझिटिव्ह आली. निवेदिता सराफ पॉझिटीव्ह आल्यानंतर ‘अग्ग बाई सासूबाई’मधील इतर कलाकार गिरीश ओक, तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की यांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या. सुदैवाने त्यांच्या टेस्ट निगेटीव्ह आल्या.
काही दिवसांपुर्वी सगळ्या सिरियलच्या शुटींगला सुरुवात झाली. सेटवर कोरोनाचे सगळे नियम पाळत शुटींगला सुरुवात केली. सेटवर डाॅक्टरची टीमसुद्धा कार्यरत होती. मात्र निवेदिता सराफ यांना थोडा त्रास झाल्याने त्यांनी टेस्ट करुन घेतली तर त्यांची टेस्ट पाॅसिटीव्ह आली.
दरम्यान, निवेदिता यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर 15 सप्टेंबरपासून मालिकेचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. लवकरच मालिकेची शूटिंग पुन्हा सुरु होणार आहे. तसेच निवेदिता सराफ यांचा क्वॉरंटाईन काळ संपल्यानंतर त्या पुन्हा शूटिंगला सुरुवात करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:-