अभिनेत्रीचं फ्लर्टिंग पाहून सलमान खानला फुटला घाम

‘बिग बॉस’ हा वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून ओळखला जातो. यंदाच्या १४ व्या पर्वातही पवित्रा पुनिया, जॅस्मिन भसिन यांसारख्या अनेक ग्लॅमरस तरुणी या शोमध्ये पाहायला मिळतील. परंतु यांपैकी निक्की तंबोली ही  मात्र सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे तिचं फ्लर्टिंग पाहून  सलमान खानला देखील घाम फुटला. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री निक्की तंबोली चक्क सलमान खानसोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. “मला पुरुषांसारखं फ्लर्ट करता येत नाही पण या शोमध्ये येण्यासाठी ही कला मी अवगत करण्याचा प्रयत्न केला आहे.” असं म्हणत तिने सलमान सोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला.

तिचं हे वाक्य ऐकून सलमान जोरजोरात हसू लागला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ‘बिग बॉस’चे चाहते या व्हिडीओवर गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत.

You might also like