‘मी पण सचिन’ चित्रपटातील ‘छंद गावला’ गाणे प्रदर्शित

‘मी पण सचिन’ चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलर नंतर या सिनेमाचं ‘छंद गावला’ गाणं रिलीज झाले आहे. सिनेमाचा नायक म्हणजेच स्वप्नील जोशी आपल्या गावातून पुण्याला येतो आणि तिथे तो क्रिकेट अकॅडमीत प्रवेश मिळवतो. त्याच्या स्वप्नाच्या दिशेने पहिले पाऊल टाकताना स्वप्निलच्या मनातले अगदी अचूक भाव आणि आनंद या गाण्याच्या माध्यमातून व्यक्त होत आहे.

 हे अप्रतिम गाणं हर्षवर्धन वावरे यांच्या स्वरातील असून या गाण्याला ‘त्रिनिती ब्रदर्स’ यांनी संगीत दिले आहे. या गाण्याचे शब्दही या त्रिकूटानेच गुंफलेले आहेत. चित्रपटाची कथा गावाकडची असल्यामुळे या गाण्याचे बोलही त्याच भाषेत आहे. पण तरीही गाणं ऐकताच क्षणी मनाला भिडते. त्यामुळे शब्द कोणत्याही भाषेत असले तरी गाण्यातील भाव प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहचतात.

इरॉस इंटरनॅशनल, एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएटची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. नीता जाधव, गणेश गीते, संजय छाब्रिया आणि निखिल फुटाणे या चित्रपटाचे निर्माता आहे. तर श्रेयश जाधव यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like