‘हम चार’ चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित…..

राजश्री प्रॉडक्शन तब्बल तीन वर्षांनंतर नवीन चित्रपट बनणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली होती. ‘हम चार’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे आणखी एक नवे पोस्टर आता रिलीज करण्यात आले असून कलाकारांचे खास लूकही यात पाहायला मिळत आहेत.

चित्रपटात सिमरन शर्मा, अनशुमान मल्होत्रा, प्रित कामनी आणि तुषार पांडे हे नवोदित कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.राजश्री प्रोडक्शनच्या इतर चित्रपटांप्रमाणे फॅमिलीवरच आधारित असणार आहे. पण ही फॅमिली यावेळी काहीशी वेगळी असणार आहे.

चित्रपटाची कथा ४ मित्रांच्या भोवती फिरताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक दीक्षित हे करणार आहेत.हा चित्रपट येत्या १५ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like