लवकरच तुमच्या भेटीला येणार ‘व्हॉट्सॲप लव’

व्हॉट्सॲप लव’ ह्या चित्रपटाचा नुकताच पहिला टीजर मोशन पोस्टर प्रदर्शित झाला आहे. ज्येष्ठांना किंवा आई-बाबांना वाटेल की, हा चित्रपट व्हॉट्सॲपवरून जुळलेल्या प्रेमसंबंधांवर आधारीत असेल. आणि तरुणाईला वाटेल की, चॅटींग पार्टनर बरोबर असलेल्या बाँडींगला हे ‘व्हॉट्सॲप लव’ म्हणत असतील.

मात्र , चित्रपटाच्या शीर्षकावरून आणि हल्लीच्या कृत्रीम नातेसंबंधामुळे नेमका चित्रपट कशावर भाष्य करेल, हे समजणे कठीण आहे. या चित्रपटात कलाकार कोण आहेत हे अजून गुलदस्त्यात आहे. पण, प्रदर्शनाची तारीख ठळकपणे नमूद केली असल्याने पुढच्या गोष्टी लवकरच समोर येतील.निर्मिती आणि दिग्दर्शित असलेला एच.एम.जी. प्रस्तुत ‘व्हॉट्सॲप लव’ 5 एप्रिल रोजी सर्वांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like