सैफ-करीना पुन्हा देणार गुड न्युज

बी- टाऊनच्या  नवाबाच्या घरी आता आणखी एक आनंदाही बातमी असल्याचं म्हटलं जात आहे.करीना कपूर दुसऱ्यांना आई होणार असल्याची गुड न्यूज खुद्द सैफ व करीना दिली.’आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आमच्या कुटुंबात आणखी एक चिमुकला पाहुणा येणार आहे. सर्वांच्या शुभेच्छांसाठी आणि प्रेमासाठी खूप धन्यवाद’, असं सैफ व करीनाने म्हटलंय.

तैमुर आता 3 वर्षांचा झाला आहे. दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी कुटुंबीय उत्सुक आहेत. आतापर्यंत ही गुडन्युज फक्त करिना आणि सैफच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रांना माहिती होती. मात्र आता करिना आणि सैफने अधिकृत स्टेटमेंट जारी करत ही आनंदाची बातमी जाहीर केलीये.

गेल्या डिसेंबर महिन्यात करीना कपूरचा ‘गुड न्यूज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तिला दुसऱ्यांदा आई होण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तिने, दुसऱ्या मुलासंदर्भातील आनंदाची बातमी सध्या आमच्याकडून नाही. आम्ही तैमुरबरोबर खूप आनंदात आहोत. आम्ही सध्या आमचे काम आणि तैमुरला अधिक वेळ देण्याच्या प्रयत्नात आहोत, असे म्हटले होते.

दरम्यान, करिना ही कदाचित पहिली मेनस्ट्रीम अभिनेत्री असेल जी आपल्या गरोदरपणातही माध्यमांसमोर येण्यास लाजली नाही. करीना जेव्हा तैमूरवेळी गरोदर होती त्यावेळी कोणताही विचार न करता तिने अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली होती, तिने जाहिरातींसाठी शूट केले, लेक्मे फॅशन वीकमध्ये ती चालली, कॉफी विथ करण या शोमाध्येही ती दिसली होती.

 

You might also like