लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘यू टर्न’ ही सीरिज…..!

हिंदी, इंग्लिश या वेब मालिकांमध्ये आता मराठी सीरिजदेखील दिसून लागल्या आहेत. ‘यू टर्न’ असं या आगामी सीरिजचं नाव असून सायली संजीव या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

प्रेमाची एक नवीन ओळख करून देण्यासाठी राजश्री मराठीची ‘यू टर्न’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या माध्यमातून राजश्री मराठी पहिल्यांदाच वेबविश्वात पदार्पण करणार आहे. दिग्दर्शनाची धूरा मयुरेश जोशी यांनी स्वीकारली आहे.

या वेबसीरिजचा एका व्हिडिओद्वारे डिजिटल पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. तीस सेकंदाच्या या व्हिडीओत ओमप्रकाश आणि सायली दिसत असून दोघेही एकमेकांसोबत अतिशय आनंदी दिसत आहेत.