‘सत्यशोधक’ या बायोपिकमधून महात्मा फुलें यांच्या जीवनकार्याचा उलगडा होणार

गेल्या काही काळापासून बायोपिकचा ट्रेण्ड सुरु झाला आहे. हाच ड्रेंट आता मराठी चित्रपटसृष्टीतही पाहायला मिळत आहे. त्यामुळेच या बायोपिक चित्रपटांच्या मांदियाळीमध्ये आता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.

‘सत्यशोधक’ या बायोपिकमधून महात्मा फुलें यांच्या जीवनकार्याचा उलगडा होणार आहे. या चित्रपटासाठी संदीप कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. संदीप कुलकर्णी महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका वठविणार आहे. तर राजश्री देशपांडे सावित्रीबाई फुले यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे.