नेहाच्या ‘मुंगळा’ डान्सने जिंकली प्रेक्षकांची मने

नेहमी ‘दबंग’ आणि ‘धाकड गर्ल’ ने ओळखली जाणारी नेहा शितोळे या आठवड्यात एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली. बिगबॉसच्या घरातली टॉम बॉय नेहा चक्क विकेंडच्या डावात सालस आणि साजिऱ्या साडीमध्ये ‘मुंगळा’ गाण्यावर ठुमके लावताना दिसून आली ! टास्क असो वा घरातला एखादा वाद असो, नेहाच्या व्यक्तिमत्वात ‘मर्दानी’ ची झलक ही दिसून येतेच ! मात्र, गेल्या आठवड्यातील डावामध्ये तसेच नुकत्याच पार पडलेल्या विकेंडच्या भागात प्रेक्षकांना एक वेगळीच नेहा पाहायला मिळाली.

रक्षाबंधनच्या दिवशी नेहाने रंगबेरंगी चोळीवर घातलेली धवल रंगाची साडी तिचे व्यक्तिमत्व खुलवण्यास महत्वाची ठरली. त्यावेळी तिने हातात तिरंगा चुडा, गळ्यात मंगळसूत्र आणि अंबाड्यात गजरा माळत स्वतःचे वेगळेपण चांगल्यापद्धतीने सादर केले होते.

त्यामुळे #NehaDeservesToWin या टॅगनुसार कधी राग, तर कधी मायाळू… कधी आसू तर कधी हसू अशी स्वभाव वैशिष्टे असलेली नेहा बिगबॉस मराठी सीजन २ च्या ट्रॉफीची आदर्श दावेदार अाहे, असे मानण्यास हरकत नाही.