‘या’ गायकासोबत बांधणार नेहा कक्कर सात जन्माची गाठ ?

गायक नेहा कक्कर लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. याआधी तिच्या लग्नासंबंधी अनेक चर्चा रंगल्या होत्या. पण आता तिने लग्नाचा मुहूर्तही ठरवला असल्याचं बोललं जात आहे.  इंडियन आयडल शोमुळे नेहा आणि आदित्य नारायण हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असून ते लग्न करणार असल्याची अफवा उठली होती.

शोला हीट करण्यासाठी हा लव्ह अँगल तयार करण्यात आला होता. दरम्यान या आधी नेहा आणि हिमांश अनेक दिवस एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते. पण नंतर त्यांचा ब्रेकअप झाला. पण या सगळ्या चर्चेनंतर अखेर नेहाने लग्नाचा फायनल निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.

प्रसिद्ध गायक रोहनप्रीत सिंगच्या हवाल्याने रोहनप्रीत सिंग आणि नेहा लग्न करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या महिन्याच्या शेवटच्या तारखेला त्यांचा विवाह होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दोघांमध्येही लग्नाविषयी फायनल चर्चा झाली असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

You might also like